शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निविदेअभावी एका वर्षापासून नवीन घंटागाड्या जागेवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:08 IST

निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : केवळ निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत. निविदा प्रक्रिया नेमकी कशामुळे रखडली, याचा उलगडा होउ शकला नाही.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून रिसोड नगर परिषदेने एका वर्षापूर्वी १४ घंटागाड्या खरेदी केल्या. परंतू, मागील एका वर्षापासून या घंटागाड्या जागेवरच आहेत. यामुळे ५० लाखांची गुंतवणूक तुर्तास तरी व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येते. नगरपरिषदेच्या या नवीन घंटागाड्या स्वमालकीच्या असतानाही अमरावतीच्या कंत्राटदाराच्या घंटागाड्या कार्यरत आहेत. अमरावतीच्या कंत्राटदाराची मुदत होऊनसुद्धा पुन्हा नुतनीकरण करण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या नाहीत. नगर परिषदेला या आपल्या मालकी हक्काचा घंटागाड्याचा कोणत्याही प्रकारे विनियोग करता येत नसल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला त्याच्या वाहनांचे दरमहा भाडे द्यावे लागत आहे. यामुळे नगर परिषदेला दुहेरी नुकसान सहन करावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नवीन घंटागाड्या वर्षभरापासून जागेवरच असल्याने त्या खराब होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमरावती येथील कंत्राटदाराचे कंत्राटाची मुदत रद्द करून नगरपरिषदने आपल्या स्वमालकीच्या घंटागाडीचा उपयोग करावा आणि पैशाचा अपव्यय टाळावा, अशा प्रतिक्रिया नगरसेवकांमधून उमटत आहेत. यावर नगर परिषद प्रशासन नेमका काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. सदर नवीन घंटागाड्याची निविदा प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. निविदा प्रक्रियेची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसात सदर नवीन घंटागाड्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- गणेश पांडेमुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड