शहरातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा नवीन ठाणेदाराचा मानस रिसोड स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले ठाणेदार सारंगधर नवलकार यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदाचा पदभार हाती घेतला असून रिसोड शहरातील संपूर्ण अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरातील अवैध धंद्यावर त्यांच्या चमूकडून धाडी टाकण्यात येत असून शहरातील मनोरंजन क्लब, अवैध वरली व्यवसाय, अवैद्य गुटखा, अवैध दारू, नियमबाह्य वाहतूक या सर्व गोष्टींवर त्यांनी नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू असल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून ठाणेदार नवलकार यांचे संपूर्ण स्तरातून स्वागत होत आहे.
मी पदभार घेण्यापूर्वीच रिसोड शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती होती. हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा आपला मानस आहे.
-सारंगधर नवलकार,
ठाणेदार, रिसोड