शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत धूळखात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:05 IST

शिरपूर जैन (वाशिम) : केवळ संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीतूनच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. 

ठळक मुद्देदुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंत नसल्याने या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत होऊ शकले नाही. दोन बाजूचे संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यासाठी निधीची गरज आहे.

शिरपूर जैन (वाशिम) : केवळ संरक्षण भिंतीअभावी शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची सुसज्ज इमारत गत काही वर्षांपासून धूळ खात आहे. संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध नसल्याने भाड्याच्या इमारतीतूनच दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. 

मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने सुरूवातीपासूनच दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. इमारत बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी तत्कालिन इमारत दिवंगत सुभाषराव झनक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सन २०१२ मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात झाली होती. सन २०१६-१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र निधीअभावी संरक्षण भिंतीचे काम होऊ शकले नाही. तेव्हापासून सदर इमारत जैसे थे आहे. संरक्षण भिंत नसल्याने या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत होऊ शकले नाही. दोन बाजूचे संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होण्यासाठी निधीची गरज आहे. निधी कधी मिळणार आणि या इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरीत कधी होणार? याकडे शिरपूरसह मालेगाव तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचना अधीक्षकांना दिलेल्या आहेत. संरक्षण भिंतीसाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्याची सूचनाही संबंधितांना दिली आहे. हा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविल्यानंतर शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल.- अमित झनक, आमदाररिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ.

टॅग्स :washimवाशिम