शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेजारधर्म...कर्करोगग्रस्त युवकाच्या मदतीसाठी शेजाऱ्याने ठेवली शेती गहाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:27 IST

जातीपातीपलीकडचे नाते जपत देशमुख दाम्पत्याने शेजारधर्म पाळून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.

ठळक मुद्दे पैशाची जुळवाजूळव कशी करावी, याची चिंता त्या युवकाच्या आई-वडीलांना लागली.कर्ज काढले व त्या युवकाला नागपुर येथे उपचार करण्याकरिता दिड लाख रूपयाची मदत केली.

- बबन देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : शेजारधर्म कसा असावा, याचा आदर्श नमुना कारखेडा येथील देशमुख दाम्पत्याने इतरांसमोर ठेवला आहे. शेजारच्या कर्करोगग्रस्त युवकाला उपचारासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देण्याकरीता याच दाम्पत्याने बँकेकडे शेती गहाण ठेवून दीड लाख रुपयांची मदत केली.कारखेडा येथील एका युवकाच्या मुखामध्ये छोटीशी गाठ आल्याने मानोरा, वाशिमसह अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले. उपचाराअंती त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले. कर्करोग हा गंभीर स्वरुप धारण करण्यापूर्वी तातडीने उपचार करावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला. परिस्थिती हलाखीची असल्याने आणि जवळचा पैसा यापूर्वीच्या उपचारावर खर्च झाल्याने आता उपचारासाठी पैशाची जुळवाजूळव कशी करावी, याची चिंता त्या युवकाच्या आई-वडीलांना लागली. अनेकांकडे पैशाची मागणी केली; परंतू, पदरी निराशा पडल्याने मुलाच्या कर्करोगावर उपचार होणार की नाहीत, या प्रश्नाने आई-वडीलांची झोप उडाली. ही बाब शेजारी राहणारे बाळासाहेब शंकरराव देशमुख व पुष्पाताई बाळासाहेब देशमुख या शेतकरी दाम्पत्याला समजताच, काही काळजी करू नका, पैशाची तरतूद करतो, असे म्हणत आजारी युवकासह कुटुंबियांना धीर दिला.शेतीचा खर्च आटोपता घेत शेतीवर पीक कर्ज काढले व त्या युवकाला नागपुर येथे उपचार करण्याकरिता दिड लाख रूपयाची मदत केली. शासनाकडून मिळणाºया सवलती आणि हे दीड लाख रुपये यामुळे त्या युवकाचे प्राण वाचले. जातीपातीपलीकडचे नाते जपत देशमुख दाम्पत्याने शेजारधर्म पाळून इतरांनाही प्रेरणा दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल