शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्भवतींची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:20 IST

गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असतांना सुध्दा कर्तव्यावर तैनात असलेल्या डॉक्टर, परिचारिकांनी त्या महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले.

- शिखरचंद बागरेचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दाखल झालेल्या गर्भवत महिलांची प्रचंड हेळसांड होत आहे. प्रसुतीसाठी आलेल्या तीन गर्भवतींकडे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागल्याचा प्रकार २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी घडला. यातील एका महिलेची खासगी दवाखान्यात प्रसुती झाली, तर इतर दोघींबाबत माहिती मिळू शकली नाही.वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारीवर्ग रुग्णांना योग्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करण्याबाबत उदासीन असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. अपघातातील गंभीर जखमी, गर्भवती महिलांसह इतर रुग्णांबाबत हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यातच सोमवार २८ आॅक्टोंबर रोजी गर्भवती महिलांच्या बाबतीत असाच प्रकार पुन्हा येथे घडला. मंगरुळपीर येथील रहिवासी गर्भवती महिला शितल राजू मापारी हिला तिच्या नातेवाईकांनी सोमवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. सदर गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक असताना सुध्दा कर्तव्यावर तैनात असलेल्या डॉक्टर, परिचारिकांनी त्या महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. प्रसव कळांनी त्रस्त झालेल्या शितल मापारी हिला अकोला किंवा बाहेर खाजगी रुग्णालयात नण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना देऊन त्यांना ताबडतोब बाहेर जाण्याचा दमही त्यांनी भरला. परिणामी मापारी कुटूंबाने गर्भवती महिलेस बाहेर खाजगी रुग्णालयात नेण्याची तयारी करुन रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दोन तासापर्यंत प्रतिक्षा करूनही रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्यांनी गर्भवतीस आॅटोरिक्षाने वाशिम येथील खाजगी रुग्णालयात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दाखल केले. सदर गर्भवती महिलेची रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रसुती झाली. अशीच वागणूक याच दिवशी इतर दोन गर्भवती महिलांनाही येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनाही अकोला येथे किंवा शहरातील खाजगी रुगणालयात जाण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाºयांनी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी संबंधित महिला रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

सदर गंभीर प्रकाराची आपण चौकशी करू. सोमवार २८ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित कक्षात कर्तव्यावर कोण होते, याचीही चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाºयावर कारवाई करण्यात येईल.- अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकीत्सक वाशिम

सकाळपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्यानंतरही सायंकाळपर्यंत माझ्याकडे कोणत्याही अधिकारी, परिचारीका व कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. मला प्रसवकळा होत असतानाही उपचाराऐवजी अपमानास्पद वागणूक देऊन खाजगी रुग्णालयात जाण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसतानाही नातेवाईकांनी कर्ज काढून मला खाजगी रुगणालयात दाखल केले.-शितल राजू मापारीगर्भवती रु ग्ण, मंगरुळपीर

 

 

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल