शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पीक विम्यापोटी ४५० कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:03 PM

पीक विमा उतरविणाºया शेतकºयांत ८५ हजार ३९५ कर्जदार शेतकरी असून, २ लाख ९ हजार ८९५ शेतकरी बिगर कर्जदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानामुळे पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने आकडेमोड केली असून, नुकसानग्रस्त शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी अंदाजे ४५० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. दरम्यान, ज्यांनी पीक विमा भरला नाही त्या शेतकºयांच्या मदतीचा अंदाज मात्र अद्याप प्रशासनाला काढता आला नाही.वाशिम जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून अवकाळी पावसाने थैमान घालत शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत मंजूर करण्यासाठी शासनाने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला. त्यात पीक विमा भरणाºया आणि न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाचीही पाहणी करण्याच्या सूचना होत्या, तर नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसानाचा तक्रार अर्ज पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. या प्रक्रियेला २८ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. प्रत्यक्षात जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पीक विम्यापोटी भरले आहेत. पीक विमा उतरविणाºया शेतकºयांत ८५ हजार ३९५ कर्जदार शेतकरी असून, २ लाख ९ हजार ८९५ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. तर जिल्ह्यात ३१ आॅक्टोबरपर्यंत ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांच्या आधारे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई म्हणून मदत देण्यासाठी केलेल्या आकडेमोडीनुसार आजवरच्या अर्जांसाठी अंदाजे ३६९ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तथापि, अद्याप अनेक शेतकºयांच्या तक्रारी पीक विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या नसून, जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी आणि नुकसानाचे प्रमाण गृहीत धरता पीक विम्यापोटी नुकसानभरपाई म्हणून अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीला वाशिम जिल्ह्यात जवळपास ४५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमही शेतकºयांना अदा करावी लागण्याची शक्यता पीक विमा कंपनी प्रतिनिधी आणि प्रशासनाने वर्तविली आहे. जिल्ह्यात शेतकºयांच्या अडचणी लक्षात घेता अद्यापही तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, पीक विमा कंपनीच्या तालुका समन्वयकांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवारी तलाठी, कृषी सहायकांसह प्रशासकीय कर्मचाºयांच्या पथकांकडून प्रत्यक्ष पीक नुकसानाच्या पाहणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचाही समावेश असून, हे पथक गावोगावी फिरून शेताना प्रत्यक्ष भेटी देत पीक नुकसानाच्या नोंदी घेत आहे. दरम्यान, आता तालुका कृषी कार्यालयावर अर्ज स्वीकारणे बंद होणार असून, शनिवारपासून शेतकºयांना त्यांनी ज्या बँकेत पीक विमा भरला त्या बँकेकडे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले आहे. 

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा