शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:20 IST

वाशिम : मुंबईत येथे राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका सुरु असून, ७ आॅक्टोबर रोजी वाशिम -यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर राकॉने दावा केला आहे. युतीत आतापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला आहे.लोकसभा मतदारसंघाची चाचपणी म्हणून ही महत्वपूर्ण बैठक असून, रविवारी वाशिम जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्ह्यातील राकाँची परिस्थिती मांडली. या बैठकीला राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आमदार छगन भूजबळ यांच्यासह राकाँचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.यावेळी राकॉने वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा कसा ठरणार या मुद्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. काँग्रेस, राकाँ युतीत वाशिम-यवतमाळ मतदारसंघ हा आतापर्यंत काँग्रेसकडेच राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेत राकाँचे वर्चस्व आणि एकंदरीत अन्य बाबी मांडत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. राकाँच्या या भूमिकेला काँग्रेसचा कसा प्रतिसाद मिळतो, वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस दावा सोडणार का, हे प्रश्न तुर्तास  अनुत्तरीय असून यामुळे राजकारण मात्र तापत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना