शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसी बटालियनचे प्रशिक्षण केंद्र गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:10 IST

Washim News कोरोनाच्या संकटामुळे प्रश्न ‘जैसे थे’ राहिला असून अद्याप प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकले नाही.  

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यालाही एन.सी.सी. बटालियनचे प्रशिक्षण केंद्र मंजूर होऊन ५ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. जागा मंजुरीअभावी प्रलंबित असलेला हा प्रश्न तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गी लावला होता. जानेवारी २०२० या महिन्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ताब्यातील जागा मंजूर करण्यात आली; मात्र त्यानंतर उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रश्न ‘जैसे थे’ राहिला असून अद्याप प्रशिक्षण केंद्र सुरू होऊ शकले नाही.  जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील शेकडो विद्यार्थी एन.सी.सी.मध्ये दाखल आहेत. त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळावे, यासाठी एन.सी.सी. बटालियन आवश्यक आहे. त्यास अनेक वर्षांपूर्वी मंजुरीदेखील मिळाली; मात्र पर्याप्त जागेसह अन्य सुविधांअभावी हा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यान, शासनाकडे सलग पाठपुरावा करून तथा वाशिम-रिसोड रस्त्यावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विनावापर पडून असलेल्या जागेस मंजुरी मिळवून तिथे एन.सी.सी. बटालियन सुरू करण्यास शासनाने हिरवा झेंडा दाखवला. सन २०२० मध्येच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जागेवर एन.सी.सी. बटालियन सुरू होणार होते. त्या ठिकाणी दरवर्षी शाळास्तरावरील एनसीसीमध्ये दाखल ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यानुसार, आर्मीचा विशेष चमू वाशिममध्ये दाखल होऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचा निर्णय झाला होता; परंतु त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे एनसीसी बटालियन प्रशिक्षण केंद्राचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस प्रयत्न करून केंद्र सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अनभिज्ञएनसीसी बटालियनच्या प्रशिक्षण केंद्राचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्यास हजारो विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. असे असताना विद्यमान जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस. यांना याबाबत छेडले असता, ते यासंदर्भात पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. मी नव्यानेच रुजू झाल्याने माहिती घेतल्यानंतर चर्चा करू, असे सांगून त्यांनी हात झटकले.

टॅग्स :washimवाशिम