शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे नवोदय विद्यालय परिक्षेची रंगीत तालीम; ५०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:06 IST

मालेगाव:- इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात रविवारी मोफत सराव परिक्षेचे आयोजन, तसेच मार्गदर्शन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात रविवारी मोफत सराव परिक्षेचे आयोजन, तसेच मार्गदर्शन करण्यात आले होते.या परिक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळा मिळून ५० शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यात उत्कृष्ट कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.  

मालेगाव:- इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालयात रविवारी मोफत सराव परिक्षेचे आयोजन, तसेच मार्गदर्शन करण्यात आले होते.या परिक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळा मिळून ५० शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.  

विद्यार्थ्यांच्या मनातील नवोदय परिक्षेची भीती दूर व्हावी, वेळेचे बंधन पाळून भयमुक्त वातावरणात त्यांना परिक्षा देता यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मालेगाव येथील  ना. ना. मुंदडा विद्यालयात तालुकास्तरीय मोफत सराव परिक्षा घेण्यात आली. नवोदय प्रवेश परिक्षेच्या धर्तीवर या परिक्षेत विद्यार्थ्यांकडून प्रश्न सोडवून घेण्यात आले. या परिक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळा मिळून एकूण ५० शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्याच्या बाहेरीलही काही विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यााचा गुणानुक्रम निश्चित केला. यात सर्वाधिक गुण मिळवणाºया पहिल्या दहा जणांना बक्षीस प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंदडा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सतीश नवगजे, तर प्रमुख अतिथी म्हणून नवोदय विद्यालय वाशिमचे प्रा. काळे,  प्रा. मदनकार तसेच विद्यालयाचे व्यवस्थापक गोविंद पुरोहित, नीता किरण जिरवणकर,  जगदीश बळी, डॉ. सीमा चव्हाण, नगरसेविका सुषमा सोनोने, प्रा. सावजी, विलास परिहार, आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजेश मोरे यांनी केले प्रास्ताविक अमोल कल्याणकर यांनी केले. पहिल्या दहा विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रासह भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. निकालाचे वाचन राजेंद्र गिरी यांनी तर आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा