काेठारी येथील शेतकऱ्यांची शेती सिंगडोह, चांधई, बोरव्हा,जनना व स्वासीन शिवारात माेठ्या प्रमाणात आहे, परंतु सिंगडोह, बोरव्हा, जनुना व स्वासीन शेतशिवारातील पांदण रस्ते म्हणजे गेल्या आठवड्यातील संततधारेने नदी नाल्यांचेच रूप आले आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस उघडला असून, तरीही भरपूर गावशिवारात फवारणीकरिता टॅक्टर जाऊ शकत नाही, तर बैलगाडी सुद्धा जाणे कठीण झाले आहे. सिंगडोह, बोरव्हा, जनुना व स्वासीन भागातील शेतात पांदण रस्ते खराब झाल्याने मजूर वर्ग सुद्धा या परिसरातील शेतात कामाला यायला कंटाळा करत आहेत. तरी वरील परीसरातील पांदण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे येथील पं. स. सदस्य विलास गायकवाड यांनी सांगितले.
310721\187-img-20210731-wa0013.jpg
पांदन रस्तांचे झाले नदी, नाले