शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड

By सुनील काकडे | Updated: October 8, 2022 15:59 IST

Nashik Bus fire: नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

- सुनील काकडे

वाशिम : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही. ट्रॅव्हल्स बुकींग ऑफीस चालविणाऱ्यांच्या नावे तिकीट बुक आहेत. यामुळे अपघातग्रस्तांची ओळख नेमकी कशी पटणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यामुळे आतमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांचा जागीच जळून कोळसा झाला; तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर प्रवाशी नेमके कुठले, याची चाचपणी केली जात आहे; मात्र अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे अधिकृतरित्या प्रवासाचे तिकीट बुकींग नाही; तर नेहमीप्रमाणे तिकीट बुकींग करणाऱ्यांनी स्वत:च्या नावे तिकीट बुक केलेले आहे. त्यांचीच नावे यादीमध्ये दिसून येत आहेत. संबंधितांच्या नावासमोर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाब उघड झाली. यामुळे अपघातग्रस्तांची ओळख नेमकी कशी पटणार आणि जखमींपैकी कुणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरकारकडून मदत नेमकी कशी मिळणार, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.केनवडवरून बसलेल्या प्रवाशांचा यादीत नामोल्लेख नाहीवाशिम जिल्ह्यातील केनवड (ता.रिसोड) येथून शेख इस्माईल आणि जैतून लतीफखाॅं पठाण हे दोन प्रवाशी चिंतामणी ट्रॅव्हल्सने नाशिककडे रवाना झाले होते. ते अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. मात्र, या दोन्ही प्रवाशांचा जखमींच्या यादीत कुठेच नामोल्लेख नाही. कारण जाणून घेतले असता, केनवड येथील ट्रॅव्हल्स तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्या इसमाने मालेगावातून दोघांची तिकीटे काढून दिली. तिकीट त्याने स्वत:च्या नावाने बुक केले. त्यामुळेच मोठा घोळ निर्माण झाल्याची बाब उघड झाली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात