शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्त्यांमुळे रुग्णालयांची वाट बिकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 11:49 IST

Washim Hospital News वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते, लघुव्यावसायिकांचे अतिक्रमण आदींमुळे रुग्णालयापर्यंत अग्निशमन वाहन नेण्यात अडचण येऊ शकते.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते, लघुव्यावसायिकांचे अतिक्रमण आदींमुळे रुग्णालयापर्यंत अग्निशमन वाहन नेण्यात अडचण येऊ शकते.भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी व खासगी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्राॅनिक वायरिंग व्यवस्था याबरोबरच रुग्णालय परिसरातील अतिक्रमण, रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग, अरुंद रस्ते आदी बाबीही चव्हाट्यावर येत आहेत. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालय आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुदैवाने अतिक्रमण नसल्याने वाहने येण्यास व जाण्यास कोणताही अडथळा येत नाही. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा व वाशिम शहरातील काही अरुंद रस्त्यालगत असलेल्या काही खासगी रुग्णालय परिसरात रस्त्यालगतच वाहनांची पार्किंग होत. तसेच लघुव्यावसायिक हे विविध प्रकारची खेळणी व अन्य साहित्याचे हातगाडे, दुकाने थाटत असल्याने आपत्कालीन काळात अग्निशमन विभागाचे वाहन येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. रिसोड, मालेगाव, कारंजा शहरातील काही रुग्णालय हे मुख्य बाजारपेठ तसेच गल्लीबोळीत सुरू आहेत. यातील काही रुग्णालये अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. काही रुग्णालयांचे आपत्कालीन मार्गही अरुंद असल्याने अशा रुग्णालयास आग लागल्यास तिथे अग्निशमन विभागाची गाडी जाणेही कठीण होऊ शकते. स्थानिक प्रशासनाकडून रुग्णालयाची पाहणीच नाहीजिल्ह्यातील शहरांमधील गल्लीबोळात असलेल्या रुग्णालयापर्यंत आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन विभागाची गाडी पोहचू शकेल का? याची पाहणी स्थानिक प्रशासनाकडून झाली नसल्याची माहिती आहे..

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल