धनज बु. येथून जवळच असलेल्या मेहा येथे टरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदाही येथील शेतकऱ्यांनी शेकडो एकरात टरबूज लावले आहेत. आता हे टरबूज तोडणीवर आले असून, शेतकऱ्यांनी त्याची व्यापाऱ्यांना विक्रीही केली आहे. टरबुजाची तोडणी करून ते ट्रकमध्ये नेण्याचे काम व्यापाऱ्यांनी सुरू केले आहे. अशात गुरुवारी रात्री शेतामधील टरबुजांची तोडणी केल्यानंतर, ते एका ट्रकमध्ये वाहून नेण्यात येत होते. गावातील रस्ते आधीच अरुंद असताना, या रस्त्यावर बांधकामासाठी खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. यामुळे खडीचा ढिगारा चुकवून चालक मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असताना, ट्रकवरील नियंत्रण सुटले व हा ट्रक रस्त्यालगतच्या नालीत फसला. हा ट्रक काढण्याची कसरत सुरू असून, रस्ता अरुंद असल्यामुळे अद्याप येथे क्रेनही पोहोचू शकली नाही.
अरुंद रस्ता, खडीच्या ढिगामुळे नाल्यात फसला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST