शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची नॅनोला धडक, पाच गंभिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:22 IST

मलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअपघातात अकोला येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील मोहनप्रसाद दुबे व वनविभागाचे रेंजर आॅफिसर रमेश दुबे यांचे कुटूंबीय जखमी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ; उपचारार्थ अकोला येथे हलविलेउर्वरीतांवर जखामिंवर स्थानीय रुग्णालयात उपचार करण्यात आले  

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा):  भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये अकोला येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील मोहनप्रसाद दुबे व वनविभागाचे रेंजर आॅफिसर रमेश दुबे यांचे कुटूंबीय जखमी झाले. अत्यवस्थ झालेल्या महिलेस अकोला हलविण्यात आले असून उर्वरीतांवर स्थानीय कोलते रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राधाकृष्ण प्लॉट येथील दुबे परिवारातील सदस्य मोताळा तालुक्यातील टेंभी माकोडी येथील कार्यक्रम आटोपून टाटा नॅनो कार क्र.एमएच-पी-४०६१ ने परतीच्या वाटेवर होते. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरून नागपुरकडून मुंबईकडे भरधाव जाणारा ट्रक क्र.एमएच३४-ए-५३३६ कारवर आदळला. या अपघातात नॅनो चालक रमेश बिहारीलाल दुबे (वय ५८), मोहनप्रसाद बिहारीलाल दुबे (वय ५४), सौ.संगीता मोहनप्रसाद दुबे (वय ४५), अनिता रमेश दुबे (वय ५१), सौ.गिता अनिल दुबे असे पाच जण गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी अनिता दुबे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतरांवर डॉ.कोलते रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तपास सपोनि साहेबराव खांडेकर करीत आहेत.  

टॅग्स :Accidentअपघातmalkapur bypassमलकापूर बायपास