शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टीव्हिटी नसल्याच्या नावाखाली मंगरुळपीर स्टेट बँकेतील व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:52 IST

वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे  कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देमागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत.

वाशिम: सर्व्हर कनेक्टीव्हीटी नसल्याचे  कारण सांगून स्टेट बँके च्या मंगरूळपीर शाखेतील संपूर्ण व्यवहार मागील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून स्टेट बँकेच्या मंगरुळपीर येथील शाखेचे व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या त्यासाठी कारणीभूत असल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. मंगरुळपीर येथे सर्वच राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँके च्या शाखाही बीएसएनएलच्या सर्व्हरशी जोडल्या आहेत. तथापि, स्टेट बँक वगळता इतर सर्वच बँकांचे व्यवहार मात्र सुरळीत चालू आहेत. त्यातही स्टेट बँकेच्या इतर ठिकाणच्या शाखांतही ही अडचण नाही. त्यामुळे स्टेट बँके च्या मंगरुळपीर येथील शाखेसाठी बीएसएनएलचे स्वतंत्र सर्व्हर आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलशी जोडले असलेल्या कार्यालयांचे कामकाजही सुरळीत सुरू आहेत. मग मंगरुळपीर स्टेट बँकेच्या व्यवहारांनाच अडथळा कसा निर्माण झाला, हे न उलगडणारे कोडे आहे. कारण कोणतेही असले तरी, व्यवहार बंद असल्यामुळे येथे दरदिवशी येणारे हजारांवर ग्राहक, खातेदार प्रचंड अडचणीत सापडले असून, त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नही केले जात नसल्याचे दिसत आहे.  कनेक्टीव्हिटीचा अभाव असेल, तर तो दूर करण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत, असा प्रश्न ग्राहकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय सर्व्हर कनेक्टीव्हिटी नाही, असा फलक कोठेही लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना माहितीच होत नसल्याने त्यांच्या येरझारा मात्र सुरूच आहेत.   पण, कनेक्टीव्हीटी नसल्याचे सांगून बँक व्यवहार रोखणे आणि त्यासाठी सर्व ग्राहकांना वेठीस धरणे ही फार मोठी फसवणूक आहे. जर कनक्टीव्हीटी नाही तर तो प्रश्न प्रश्न तात्काळ सोडविणे आवश्यक होते. तसे वरीष्ठ पातळीवर कळविणे व वरिष्ठ पातळीवरून संबंधित तज्ञ, तंत्रज्ञ, वा इतर यांना पाठवून अडचण दूर करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. पण, तसे काहीही दिसले नाही. -निलेश मिसाळ, खातेदार ग्राहक, स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया