शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथील नाफेडचे खरेदी केंद्र नावापुरतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:29 IST

मंगरुळपीर (वाशिम): शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगरुळपीर येथे अखेर गत १५ दिवसांपूर्वी नाफेडद्वारे उडिद, मुग आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी कें द्र सुरू करण्यात आले; परंतु या ठिकाणी अद्याप शेतक-यांकडून सोयाबीनचा एकही दाणा खरेदी करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देसोयाबीनची खरेदीच नाहीमंगरुळपीर बाजार समितीमधील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगरुळपीर येथे अखेर गत १५ दिवसांपूर्वी नाफेडद्वारे उडिद, मुग आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी कें द्र सुरू करण्यात आले; परंतु या ठिकाणी अद्याप शेतक-यांकडून सोयाबीनचा एकही दाणा खरेदी करण्यात आलेला नाही. सोयाबीनमध्ये ओलावा असल्याच्या नावे, ही खरेदी बंद ठेवण्यात आल्याचे कळले, तर केवळ ५९२ क्विंटल उडिद आणि ४० क्विंटल मुगाची येथे खरेदी होऊ शकली.यंदा अल्प पावसामुळे शेतक-यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. उडिद, मुगासह सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली. असे असतानाच बाजारात हमीदरापेक्षा खूप कमी दरात उडिद, मुग आणि सोयाबीनची खरेदी करून शेतक-यांची लुबाडणूक करण्यात येत होती. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा मिळावा म्हणून लोकप्रतिनिधींनी शासन, प्रशासनाकडे नाफेडचे केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी खरेदी विक्री समितीमार्फत शेतक-यांकडील उडिद, मुग आणि सोयाबीनची प्रमाणानुसार नोंदणीही करून घेण्यात आली. शेतक-यांकडील उडिद, मुग संपत आले असताना आणि सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत असतानाही नाफेड केंद्र सुरू करण्याची तसरी घेण्यात आली नाही. अखेर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मंगरुळपीर येथे नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु गत १५ दिवसांच्या कालावधित येथे केवळ ५९२ क्विंटल उडिद आणि ४९ क्विंटल मुगाची खरेदी झाली; परंतु सोयाबीनच्या खरेदीचा मुर्हूत अद्याप निघालेला नाही. त्यामुळे आता शेतक-यांकडील सोयाबीन अर्धे अधिक संपल्यानंतर पुन्हा व्यापा-यांना संधी देण्यासाठी येथे सोयाबीनची खरेदी सुरू होईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात संबंधित अधिका-यांकडे चौकशी केली असता सोयाबीनमध्ये ओलावा असल्यामुळे येथे खरेदी सुरू केली नसल्याचा अजब युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला. याची दखल राज्य शासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी