वाशिम : मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील किनखेडा येथील शारदा टाले या २0 वर्षीय युवतीने वाशिम शहरानजीक असलेल्या देवाळा परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, तिच्याजवळ पोलिसांना आढळून आलेल्या ह्यसुसाईड नोटह्णवरील अक्षर आपल्या बहिणीचे नसल्याचा दावा तिच्या भावाने केल्यामुळे ही घटना आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचली आहे. वाशिम शहरानजीक असलेल्या देवाळा परिसरातील एका शेतामध्ये असलेल्या बोरीच्या झाडाला शारदाने ५ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंचानामा करतेवळी शारदाच्या कपड्यामध्ये पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये ह्यश्रीकांत अरुण इंगोले या व्यक्तीने धोका दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्याह्ण असे लिहिलेले आढळून आले. शारदाजवळ आढळून आलेल्या ह्यसुसाईड नोटह्णमुळे पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी शारदाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. ६ एप्रिल रोजी मृतक शारदाचा भाऊ वाशिम पोलीस स्टेशनला आला. यावेळी मृतक शारदाच्या भावाला सुसाईड नोट दाखवून अक्षराची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला; परंतु शारदाच्या भावाने सुसाईड नोटवरील अक्षर आपल्या बहिणीचे नसल्याचे सांगितल्याने पोलीस आणखीनच संभ्रमात पडल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
युवतीच्या आत्महत्येचे गूढ वाढले!
By admin | Updated: April 7, 2015 02:09 IST