शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कन्या भाग्यश्री’च्या प्रस्तावांचे दिले ‘टार्गेट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 15:50 IST

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तडकाफडकी एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिकांना प्रत्येकी पाच प्रस्ताव सादर करण्याचे ‘टार्गेट’ दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणाºया कुटुंबांना विविध स्वरूपातील लाभ देण्याकरिता शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणली. मात्र, जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला कोलदांडा दिला जात असून यासंदर्भात ‘लोकमत’ने १० डिसेंबरच्या अंकात ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा प्रचार-प्रसार थंडावला!’, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तडकाफडकी एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिकांना प्रत्येकी पाच प्रस्ताव सादर करण्याचे ‘टार्गेट’ दिले. सोबतच या कामात हयगय झाल्यास धडक कारवाईचा इशाराही दिला.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाºया कुटूंबात जन्माला आलेल्या मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाने ‘सुकन्या’ योजनेचे रुपांतरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेत केले. यामाध्यमातून लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे, समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात सामुहिक चळवळ निर्माण करणे आदी उद्देश बाळगण्यात आले आहेत. दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) आणि दारिद्रयरेषेवरील (एपीएल) कुटूंबातील मातेने एकाच मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास ५००० हजार रुपये; तर पहिली मुलगी असताना दुसºयांदाही मुलगीच झाल्यानंतर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केली असल्यास दोन्ही मुलींना २५०० हजार रुपये रोख लाभ दिला जातो. याशिवाय अन्य स्वरूपातीलच लाभ मिळवून दिले जातात. असे असताना महिला व बालविकास विभागाकडून दिरंगाईचे धोरण अंगिकारण्यात आल्याने ग्रामीण भागातील पात्र कुटूंबांना योजनेचा लाभ मिळणे दुरापास्त झाले होते. दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’ने १० डिसेंबरच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील १७ ही पर्यवेक्षिकांना प्रत्येकी ५ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत या कामात हयगय झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे १३ डिसेंबरच्या आढावा सभेतही या विषयावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद