शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुठ्ठा गावातही रोहयोच्या कामांमध्ये घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:44 IST

वाशिम : वाघळूद, ब्राम्हणवाडा या गावांप्रमाणेच मालेगाव तालुक्यातील मुठ्ठा या गावातही रोहयोच्या कामांमध्ये लाखोंचा घोटाळा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाघळूद, ब्राम्हणवाडा या गावांप्रमाणेच मालेगाव तालुक्यातील मुठ्ठा या गावातही रोहयोच्या कामांमध्ये लाखोंचा घोटाळा झाला. याप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या समितीने थातूरमातूर चौकशी केली असून ही समिती देखील भ्रष्टाचाऱ्यांना मॅनेज झाली, असा आरोप मुठ्ठा येथील गावकऱ्यांनी केला. याप्रकरणी विभागीय स्तरावरून चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी; अन्यथा स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्ट रोजी गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा देण्यात आला.मालेगाव तालुक्यातील गट ग्राम पंचायत वाघळूदमध्ये येणाºया मुठ्ठा या गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड, नाला रुंदीकरण, शौच खड्डे, ई क्लास जमिनीवर शेततळे आदी कामे प्रस्तावित होती; मात्र कामे कागदोपत्री दाखवून देयके काढण्यात आली. गावातील अनेकांच्या घरानजिक अद्यापही शौचखड्डे तयार झालेले नाहीत. यासह रोहयोची इतरही कामे न करताच मलिदा लाटण्यात आला. ३० जुलै २०१९ रोजी लेखापाल यांची विशेष ग्रामसभा वाघळूद येथे होणार होती. त्या सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर चर्चा होणार होती; परंतु ऐनवेळी वाघळूदऐवजी मुठ्ठा या गावात ग्रामसभा घेण्यात आली. त्याची रितसर दवंडी न दिल्याने ग्रामस्थ हजर राहू शकले नाही. या सर्व बाबींची विभागस्तरीय चौकशी करावी व शासनाची दिशाभूल करून रोहयोचा निधी हडपणाºया सरपंच, सचिवावर कठोर कारवाई करावी; अन्यथा मुठ्ठा येथील गावकरी १५ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा देण्यात आला.निवेदनावर वाघळूद ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश जाधव, सतिश चांडे, हरिभाऊ निंबाळकर, भागवत डोंगरदिवे, सुनील खंडारे, बळीराम डोंगरदिवे, विलास जाधव, नारायण निंबाळकर, नारायण चांडे, गजानन जाधव, संजय चांडे, विष्णू चांडे, नंदकिशोर चांडे, मोतीराम खंडारे, नामदेव चांडे, भानदास बोरकर, विठ्ठल चांडे, नवनाथ चांडे, मनोज खंडारे, गजानन खिल्लारे, माधव कढणे, शालीक चांडे, अशोक कांबळे, श्रीराम चांडे, श्रीकृष्ण चांडे, बालाजी चांडे, भागवत साबळे आदिंच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाfraudधोकेबाजी