शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या अनैतिक संबंधातून युवकाची हत्या! आरोपीस अटक, मंगरूळपीर येथील घटना

By संतोष वानखडे | Updated: August 14, 2023 18:46 IST

वाशिम : एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाल्याने ३० वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर ...

वाशिम : एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाल्याने ३० वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी मंगरूळपीर शहरातील मानोली रोड परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित या प्रकरणातील आरोपीला तीन तासातच अटक केली. १४  ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मानोली रोड वरील सतिष बाबाराव चव्हान यांचे कॉम्प्लेक्सच्या व्हरांड्यात अनोळखी युवक रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज, पोलिस निरीक्षक सुधाकर आढे व चमूने घटनास्थळाची जावुन पाहणी केली. मृतक हा मंगेश उर्फ गोलू विठ्ठल इंगळे रा. वडरपुरा मंगरुळपीर असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. 

मृतकाला दारू पिण्याची सवय असल्याची माहिती मिळाल्यावरून आजूबाजूच्या सर्व हॉटेल, धाबे, बियर बारवर चौकशी केली असता, १३ ऑगस्टच्या रात्री मंगेश ऊर्फ गोलू हा युवराज रमेश राउत रा. नविन सोनखास, मंगरुळपीर याचेसोबत रात्री दिसुन आल्याची माहीती मिळाली. यावरुन तात्काळ पोलिस स्टेशनच्या परिसरात संशयीत युवराजचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक व आरोपीचे एका महिलेच्या अनैतिक संबंधातुन वाद झाले होते. सतिष चव्हान यांचे मानोली रोडवरील कॉम्प्लेक्समधे १३ ऑगस्टच्या रात्री अंदाजे १२ ते १ वाजताचे दरम्यान मृतक हा दारु पिवुन झोपलेला असताना, तेथीलच सिमेंट विटा डोक्यात मारल्या तसेच काचेची शिशी फोडुन मृतकाच्या गळ्यावर तिन ते चार वेळा वार केले, असेही चौकशीदरम्यान युवराज रमेश राउत याने पोलिसांना सांगितले. गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली. मृतकाचा भाऊ महादेव विठ्ठल इंगळे यांच्या तक्रारीनुसार मंगरुळपीर येथे भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरूखुनाच्या या घटनेत ईतर कोणी संशयीत आहेत काय? याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधाकर आढे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे, पोलिस उपनिरीक्षक दिनकर राठोड, कर्मचारी मोहम्मद परसुवाले, अमोल वानखडे यांनी या घटनेचा उलगडा केला. 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी