शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेच्या प्रचार, प्रसारासाठी भरघोष निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:10 IST

वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांना नियोजन विभागाने २१ जानेवारी रोजी ६.३५ कोटी रुपये वितरित केले आहेत.

वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांना नियोजन विभागाने २१ जानेवारी रोजी ६.३५ कोटी रुपये वितरित केले आहेत. यामध्ये पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी ५१ लाखांचा समावेश आहे.गरीब, होतकरू तसेच बेरोजगारांना रोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना राबविली जात आहे. या योजनेचा ग्रामीण तसेच दुर्गम भागातील जनमानसात प्रभावीपणे प्रचार, प्रसार आणि समन्वय करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रसार, प्रचार व समन्वय करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीबाबत मागणी प्रस्ताव जिल्हा समन्वय समितीने शासनाकडे पाठविले होते. त्या अनुषंगाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांना प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी नियोजन विभागाने सहा कोटी ३५ लाख ९० हजार रुपयांचा निधी २१ जानेवारी रोजी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये वाशिम व अकोला जिल्ह्यासाठी प्रत्येकी १५ लाख ४० हजार, बुलडाणा जिल्ह्यातील २१ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने मान्यता दिलेल्या जिल्हास्तरीय आराखड्यानुसार व नियोजन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर निधी खर्च करावा लागणार आहे. या निधीच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्याची तसेच खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला देण्याची जबाबदारी ‘नियंत्रक अधिकारी’ म्हणून संबंधित जिल्हाधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार केला जात आहे. शासनाकडून प्राप्त निधी मार्गदर्शक सुचनांनुसार खर्च केला जाईल.- दीपक कुमार मीनाप्रभारी जिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना