शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आसेगावचे महावितरण कार्यालय एक आठवड्यापासून कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:12 IST

MSEDCL News कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव: पोलीस स्टेशन आसेगावअंतर्गत येणाऱ्या ३ पेक्षा अधिक गावांतील वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेले आसेगाव वीज उपकेंद्राच्या अभियंत्याचे कार्यालय गेल्या आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून कुलूप बंद आहे. येथे नियुक्त करण्यात आलेले कनिष्ठ अभियंता पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे विविध अडचणींमुळे शेकडो शेतकरी आणि हजारो ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.आसेगाव येथील वीज उपकेंद्रातून शेगी, कुंभी, वारा जहॉगिर या तीन फिडरद्वारे ३०पेक्षा अधिक गावांत वीज पुरवठा केला जातो. त्यात हजारो कृषिपंप जोडण्यांसह घरगुती जोडण्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनात अडथळे येत आहेत, तर घरगुती वीजपुरवठाही खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून, लघु व्यवसायावर परिणाम होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी आसेगाव येथील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयात जात आहेत; परंतु हे कार्यालय गेल्या आठवडाभरापासून कुलूप बंद आहे. येथील कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्यानंतर आठवडाभरापूर्वीच नव्या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली; परंतु पदभार स्वीकारल्यानंतर ते कार्यालयात फिरकलेच नाहीत. या संदर्भात महावितरणच्या मंगरूळपीर उपविभागीय अभियंत्यांनाही कोणतीच माहिती नसून, कनिष्ठ अभियंता पूर्वसूचनेशिवायच अनुपस्थित असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालयच बंद असल्याने आता समस्या कोणाकडे मांडाव्या आणि सुरळीत वीजपुरवठ्याची जबाबदारी कोण घेणार,  असा प्रश्न आसेगाव परिसरातील शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.  

आसेगाव महावितरण कार्यालयात गत आठवड्यात नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. त्यांनी रजेबाबत कोणती सूचना किंवा पत्रही दिले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेऊ.-हिरालाल जांभूळकर,उपविभागीय अभियंता, महावितरण मंगरुळपीर  

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम