शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यावर हल्ला

By admin | Updated: September 10, 2015 02:14 IST

कारंजातील पेट्रोल पंपनजीकची घटना; गुन्हा दाखल.

कारंजा लाड (जि. वाशिम): वीज वितरण कंपनीचे कारंजा येथील उपकार्यकारी अभियंता अजय महादेवराव पिंगे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अभियंता पिंगे जखमी झाले असून, त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पेट्रोल पंपजवळ घडली. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अजय महादेवराव पिंगे (४२) हे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरातील काण्णव जीनमध्ये असलेल्या कार्यालयातून जेवण करण्यासाठी मंगरूळपीर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपनजीक असलेल्या हॉटेल तिरूमला येथे गेले होते. तेथून परत येत असताना सावरकर चौक मार्गे महावीर ब्रह्मचर्य आश्रममधील निवासस्थानी चालले होते. दरम्यान, मार्गात पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या डाव्या बाजूूला असलेल्या झुडुपातून अचानक एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या एमएच ३0 पी २३२0 क्रमांकाच्या धावत्या कारसमोर आला व काठी मारून समोरील हेडलाईट फोडला. कार थांबताच लगेच कारच्या दोन्ही बाजूंनी दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी काठीने व फायटरसारख्या शस्त्रांनी पिंगे यांच्या पाठ, छाती व हातावर हल्ला केला. या घटनेत उपकार्यकारी अभियंता पिंगे जखमी झाले. त्यानंतर तिन्ही अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी अवस्थेतील पिंगे यांनी घटनेची माहिती सहायक अभियंता सुशीलकुमार शुक्ला यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यांनी वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले व तत्काळ पिंगे यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता अजय पिंगे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात जमादार सुधाकर पवार करीत आहेत.