शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी सहा कोविड केअर सेंटर उभारण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:51 IST

Covid Care Centers in Washim district : आणखी काही कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरची संख्या अपुरी पडत आहे. आणखी काही कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याआनुषंगाने सहा कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत गेला. जानेवारी २०२१ या महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. हा उद्रेक सध्याही सुरूच असून, सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. वाशिम शहरातील एका कोविड केअर सेंटर येथे बेड रिक्त नसल्याने सुरकंडी येथील कोविड केअर सेंटरवर रुग्णांना पाठविण्यात येत आहे. संभाव्य बिकट परिस्थिती लक्षात घेता तसेच रुग्ण खाटा अपुऱ्या पडू नये म्हणून तातडीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच दिले. त्याआनुषंगाने जिल्ह्यात आणखी काही सरकारी कोविड केअर सेंटर सुरू करता येइल का? यादृष्टीने चाचपणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आणखी सहा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, लवकरच सहा सेंटर रुग्णसेवेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी बेड अपुरे पडू नये म्हणून आणखी सहा सरकारी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस