शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

महाविद्यालयीन शिक्षकेतरांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:26 PM

वाशिम: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दालनात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाºयांशी ७ मार्च रोजी दुपारी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शिक्षकेतरांनी आंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्यावतीने ५ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर ७ मार्च २०१९ रोजी दुपारी २.३० वा. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री विनोदजी तावडे यांच्या दालनात महासंघाच्या पदाधिकाºयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. त्यामध्ये  ७ डिसेंबर २०१८ व  १६ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून नियमित करण्याबाबत संबंधित अधिकाºयांना समक्ष आदेश देण्यात आले, तसेच तो पर्यंत ज्या कर्मचाºयांना दुसºया सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला आहे, तो तसाच चालू ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालक तसेच सर्व विभागीय सहसंचालकांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्याशिवाय संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाºयावर आकसाने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे महाविद्यलयीन कर्मचाºयांनी ५ मार्च २०१९ पासून पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आणि राज्यभरातील महाविद्यालयील कर्मचाºयांना ८ मार्च २०१९ पासून कामावर पूर्ववत रुजु होण्याच्या सुचना महासंघाच्यावतीने देण्यात आल्या.

टॅग्स :washimवाशिम