शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

खेड्यांमध्येही आंदोलन, चक्काजाम!

By admin | Updated: June 10, 2017 02:20 IST

शेतकरी उतरले रस्त्यावर : अनसिंग, माळेगाव, भटउमरा या गावांमध्ये बंद यशस्वी; वाशिममध्ये काँग्रेसकडून निदर्शने.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हय़ातील शहरी भागात आंदोलन केल्यानंतर खेड्यांमध्येही शेतकर्‍यांनी संप, चक्काजाम आणि व्यापारपेठ बंदचे हत्यार उगारले असून, शनिवार, ९ जून रोजी पुन्हा एकवेळ शेतकरी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. अनसिंग, माळेगाव, भटउमरा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. वाशिममध्ये काँग्रेसने निदर्शने केले; तर रिसोडमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंडण करून शासकीय धोरणांचा निषेध नोंदविला.सरसकट पीक कर्ज माफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतमालास उत् पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शेतकर्‍यांनी संप पुकारला. या संपात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातील शे तकर्‍यांनीदेखील विविध टप्प्यात आंदोलने केली. १ ते ७ जून या दरम्यान राज्यव्यापी संपाची हाक होती. मात्र, ८ जून आणि ९ जून रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात शेतकर्‍यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन करून शेतकरी संपाची धग कायम असल्याचे दाखवून दिले.वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आणि नजिकचे ४0 खेडे जोडल्या गेलेल्या अनसिंग येथे शुक्रवारी व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळून संपात सहभाग घेतला. तत्पूर्वी अनसिंग येथील मुख्य रस्त्यावर सकाळी सर्व शेतकरी, शिवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलन केले. कांदे, टमाटर फेकून काँग्रेसने केली निदर्शने!वाशिम : शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसने शुक्रवारी वाशिम शहरात निषेध मोर्चा काढला. याप्रसंगी कांदे, टमाटर, केळी रस्त्यावर फेकून शासनाने अवलंबिलेल्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, तालुकाध्यक्ष परशराम भोयर, माजी आमदार सुरेश इंगळे, राजू वानखेडे, अरविंद पाटील इंगोले, गजानन लाटे, राजू चौधरी, चक्रधर गोटे, वाय.के.इंगोले, वीरेंद्र देशमुख, अँड.पी.पी.अंभोरे, डॉ.विशाल सोमटकर, शालीक राठोड, राजाभाऊ देशमुख, डॉ. दादाराव देशमुख, समाधान माने, अर्जुन उदगिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंडण करून किसान संघर्ष यात्रेला सुरुवातरिसोड : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा शेतकर्‍यांनी मुंडण करून निषेध करीत रिसोड तालु क्यातील नेतन्सा येथून शुक्रवारी किसान संघर्ष यात्रेला सुरूवात केली. रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी किसान संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. या संघर्ष यात्रेची सुरूवात नेतन्सा येथून करण्यात आली. थेट शेतकर्‍यांसोबत चर्चा करून रिसोड तालुक्यातील गावागावांत शासनाच्या प्र तीकात्मक पुतळ्यांचे दहन करीत घोषणा देण्यात आल्या. याशिवाय शेतकर्‍यांनी नेतन्सा येथे मुंडण व रक्तदान करून निषेध नोंदविला.