शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती महोत्सवानिमित्त वाशिममध्ये १९ फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:20 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या शिवजयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिवाजी हायस्कुल येथून भव्य सद्‌भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन  करण्यात आले आहे. शहरातील शाळा , महाविद्यालये व मुख्य चौकांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. स्वच्छ वाशिम, सुंदर वाशिम व पाण्याची बचत काळाची गरज या विषयांवर रांगोळी स्पर्धा होणार आहे.

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने येत्या १९ फेब्रुवारीला वाशिममध्ये भव्य स्वरूपात सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन असून त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. स्थानिक वाटाणे लॉन येथे १५ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा, स्वच्छ वाशिम, सुंदर वाशिम व पाण्याची बचत काळाची गरज या विषयांवर रांगोळी स्पर्धा होणार आहे. याशिवाय १५, १६ व १७ फेबु्रवारीदरम्यान ‘चालता बोलता’ ही स्पर्धा होणार असून शहरातील शाळा , महाविद्यालये व मुख्य चौकांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजता काजळांबा येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज व आजचा  युवक या विषयावर ही स्पर्धा होईल. तसेच याचदिवशी सकाळी ११ वाजता वाशिम येथील शिवाजी हायस्कुल येथून भव्य सद्‌भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन  करण्यात आले आहे. शिवाजी हायस्कुलपासून निघणारी ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका, महाराणा प्रताप चौक, राजनी चौक मार्गे माहुरवेश, तोंडगाव मस्जिद, गणेश पेठ, टिळक चौक, सुभाष चौक, बालू चौक, शनि मंदीर, गोपाल टॉकीज, पाटणी चौक मार्गे शिवाजी हायस्कुल येथे रॅलीचा समारोप होईल, असे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज