वाशिम : येथील बालाजी कॉम्प्लेक्स परिसरामधुन एका शिक्षकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना आज २४ मे रोजी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली. काटा येथील शिक्षक गौतम यादवराव भगत दुपारी वाशिम येथील मुख्य बाजारपेठेत हिरो होंडा मोटरसायकल (एम.एच. ३७-४८१६ )घेऊन आले होते. त्यांनी आपली मोटरसायकल बालाजी कॉम्प्लेक्स परिसरात पार्कींग करून ठेवली. त्यानंतर भगत औषधी खरेदी करून परत आल्यानंतर भगत यांना मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. भगत यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दाखल केली असुन पोलिसांनी चोरट्याविरूध्द भादंविचे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.
मोटरसायकल लंपास
By admin | Updated: May 25, 2014 00:09 IST