शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाकडे मात्र पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 15:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, आता वृक्षसंवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहिम केवळ औपचारिकेपुरती मर्यादीत राहत असल्याचे दिसून येते.विविध कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने महत्त्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम जुलै महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, आता वृक्षसंवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहिम केवळ औपचारिकेपुरती मर्यादीत राहत असल्याचे दिसून येते.विविध कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने महत्त्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम जुलै महिन्यात राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्याला १२.८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले होते. प्रत्यक्षात २६.८७ लाख रोपांची लागवड करून विविध विभागांनी २०९ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतल्याने दुपटीने वृक्षारोपण झाले. वृक्षारोपण मोहिम यशस्वी झाल्यानंतर काही मोजक्या विभागांचा अपवाद वगळता उर्वरीत विभागातर्फे वृक्षसंवधर्नाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर रोपट्यांभोवती लावलेले संरक्षक कठडेही नाहीसे झाल्याचे दिसून येते. वृक्षारोपणासाठी जसा पुढाकार घेतला जातो, तसा पुढाकार वृक्षसंवर्धनासाठी प्रत्येक विभागाकडून घेतला जात नाही. परिणामी, वृक्षारोपणाच्या तुलनेत जीवंत रोपट्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. 

जिल्ह्यात १२.८३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात २६.८७ लाख रोपांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षसंवर्धनाकडेही लक्ष दिले जात आहे. वेळोवेळी होणाºया बैठकीतूनही वृक्षसंवर्धन करण्याच्या सूचना दिल्या जातात. केवळ वृक्ष लागवड करून भागणार नाही तर वृक्षसंवर्धनही झाले पाहिजेत. सर्वांच्या सहकार्यातूनच वृक्षसंवर्धन मोहिम यशस्वी होऊ शकेल.-अशोक वायाळ,सहायक उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण विभाग वाशिम

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग