मोप आरोग्य केंद्राला स्ट्रेचर नसल्याने दिव्यांग रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल नरवाडे यांनी खासदार निधीतून स्ट्रेचर द्यावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य झाली असून, ११ मे रोजी सदर आरोग्य केंद्र स्ट्रेचर देण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ सिंग, सरपंच भागवत नरवाडे, प्रकाशअण्णा नरवाडे, गजानन नरवाडे,
रवी कुमार नरवाडे, शरद नरवाडे,
संजय काळे, पुरुषोत्तम नरवाडे व भागवत नरवाडे आदींची उपस्थिती होती.