शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:20 IST

एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून ‘सुजलाम, सुफलाम’ अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रशासनाने जलसंधारणाची विविध कामे केली. त्यापैकी एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. आता ही कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तथापि, या कामांसाठी ३१ डिसेंबरपर्यंतचीच मुदत असून, सद्यस्थितीत सर्वच जलस्त्रोतात पाणी असल्याने ही कामे करण्याचे आव्हानच प्रशासनासमोर उभे झाले आहे.वाशिम जिल्ह्यात १४ नोव्हेंबर २०१८ पासून सुजलाम, सुफलाम अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात साठवण तळे, ढाळीचे बांध, दगडी नाला बांध, नाला खोलीकरण, समतल चर आदि मिळून ४०३८ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी बीजेएसच्यावतीने प्रशासनाच्या मागणीनुसार ३५ जेसीबी आणि १७ पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रस्तावित ४९ शेततळ्यांपैकी केवळ एक शेततळे पूर्ण करण्यात आले, तर इतर शेततळ्यांपैकी ४ शेततळे वगळता वाढत्या खर्चासह इतर अडचणींमुळे काही रद्द करावी लागली. त्यानंतर या अभियानातील सर्व मिळून जलसंधारणाची ७३५ कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले. तथापि, जुलै महिन्यानंतर पावसाळ्यामुळे ही कामे सुरुच होऊ शकली नाहीत, तर आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात ५८४ ढाळीचे बांध, १०७ नाला खोलीकरण आणि ४ साठवण शेततळ्यांसह इतर काही कामांचा समावेश आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नाले, नद्यांसह इतर जलस्त्रोता मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ही कामे करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाला प्रतिक्षा करावी लागणार असून, आता महिनाभरात कामे होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२९७ कामांतून ५६८ कोटीर लीटर जलसाठाजिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षी अनेक कामे विविध तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिली असली तरी, याच अभियानातून जलसंधारणाची विविध प्रकारची २९७ कामेही पूर्ण करण्यात आली असून, या कामांमुळे आता जिल्ह्यात ५६८ कोटी लीटरचा अतिरिक्त जलसाठाही निर्माण झाला आहे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील भुजल पातळीसाठी होणार आहेच शिवाय शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे.सुजलाम, सुफलाममधील प्रलंबित कामांपैकी काही कामे तांत्रिक अडचणींमुळे रद्द करावी लागली, तर काही कामे जलयुक्त शिवार अभियानातून केली जाणार आहेत. यातील अडचणींचा विचार न करता कामे कशी करता, येतील त्याचे नियोजन करण्यावरच भर दिला जात आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम