लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू होती. दरम्यान, याप्रकरणी ३० जुलैच्या अंकात ‘मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प!’, या मथळ्याखाली सर्वंकष वृत्त प्रकाशित होताच उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केली. यामुळे ४ आॅगस्टपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरूणावती प्रकल्पावरून सन १९९४-९५ मध्ये मानोरा तालुक्यातील मानोरा शहरासह २८ गावांकरिता प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीपासूनच या ना त्या कारणांनी वांध्यात सापडलेल्या या योजनेला तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागून ही योजना गेल्या महिनाभरापासून बंद पडली होती. यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांना विहिर, हातपंप, कुपनलिकांचे तुलनेने दुषित पाणी प्यावे लागत होते. याप्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासकीय उदासिनता चव्हाट्यावर आणली. त्याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमतचा दणका: मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना पुर्ववत सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:38 IST
‘मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प!’, या मथळ्याखाली सर्वंकष वृत्त प्रकाशित होताच उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केली.
लोकमतचा दणका: मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना पुर्ववत सुरू!
ठळक मुद्दे तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागून ही योजना गेल्या महिनाभरापासून बंद पडली होती. याप्रकरणी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासकीय उदासिनता चव्हाट्यावर आणली.