शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना लागला वन्यजीवप्रेमींंचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:50 IST

आता काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना या वन्यजीव प्रेमींचा लळाच लागल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देवाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा संकल्पच केला आहे.ही मंडळी रोज माकडांसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थ व पाणी आणतात.वन्यजीव प्रेमी युवक आले की माकडे अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी खेळतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वन्यजीवांचे रक्षण आणि संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्या सदस्य सतत राबवित असलेल्या उपक्रमांमुळे वन्यजिवांना मोठा आधार झाला असून, आता काटेपूर्णा अभयारण्यातील माकडांना या वन्यजीव प्रेमींचा लळाच लागल्याचे दिसत आहे. संघटनेच्या वनोजा शाखेचे सदस्य रोज माकडांना अन्नपाणी पुरवित असल्याने माकडे अगदी त्यांच्यासोबत खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळते.वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरने जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा संकल्पच केला आहे. यासाठी मानोरा तालुक्यातील कोलार आणि मंगरुळपीर तालुक्यातील कोलार येथे संघटनेच्या शाखाही सुरू केल्या आहेत. ही सर्व मंडळी वन्यजीवांसाठी सतत झटत आहे. सापांना जीवदान देणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, अपघातातील जखमी वन्यजीवांवर उपचार करणे, वन्यजिवांच्या अन्नपाण्यासाठी उपाय योजना करणे आदि कार्य ते करीत आहेत. याच अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून त्यांनी वनोजा-पूरनजिक काटेपूर्णा जंगलात माकडांना दररोज अन्नपाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बिस्किटे, केळी, पोळ्या, विविध फळे ते माकडांना खायला देतात, तसेच त्यांची तहानही भागवितात. वनोजा शाखेचे सदस्य सतिष राठोड, सौरव इंगोले, आदित्य इंगोले, वैभव गावंडे व रितेश इंगोले. ही मंडळी रोज माकडांसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थ व पाणी आणतात. माकडेही त्यांची प्रतिक्षा करीत बसलेले दिसतात. वन्यजीव प्रेमी युवक आले की माकडे अगदी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी खेळतात. त्यांनी दिलेले खाद्य हाता घेऊन खातात आणि पाणीही पितात. वन्यजीव सदस्यांच्या प्रेमामुळे मानवाप्रती असलेली भिती माकडांना आता वाटत नसल्याचे दिसते. वन्यजीवपे्रमींचा त्यांना लळा लागला असून, दिवसभर माकडे वन्यजीवप्रेमीसोबत खेळत असतात.  लोकसहभागातून केलेल्या पाणवठ्यांचा आधार वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमने मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात लोकसहभागातून पाणवठे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यातील काही पाणवठे पूर्ण झाले असून, या पाणवठ्यावर अनेक वन्यप्राणी आपली तहान भागवित आहेत. या पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडील धाव आता कमी होणार असल्याने मानव-वन्यजीव संघर्षावरही आता नियंत्रण मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवKatepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्य