मालेगाव (जि. वाशिम) : तालुक्यातील वडप येथील २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना २६ जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीहून युवकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पिडीत विवाहितेच्या तक्रारीनुसार, मालेगाव तालुक्यातील वडप येथिल शेखर उर्फ शंकर राम गायकवाड याने २६ जानेवारीला दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास पिडीत विवाहितेच्या घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. यावेळी पिडीत विवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून, विनयभंग केला. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीहून मालेगाव पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३५४, ३५४ अ, ४५२, ५0६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार पांडुरंग राठोड करीत आहेत.
विवाहितेचा विनयभंग; युवकाविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: January 27, 2016 23:28 IST