शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल क्रमांकावरही नोंदविता येणार ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 17:43 IST

वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्देध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार नोंदवू शकतात. माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी किंवा मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

वाशिम : ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले असून, जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. दुसरीकडे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी किंवा मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

विविध माध्यमातून ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस विभाग सरसावला असून, नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार नोंदवू शकतात.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका मीना, वाशिम शहरचे पोलीस निरीक्षक विजय पाटकर, वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, रिसोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, मालेगावचे पोलीस निरीक्षक एस. एच. नाईकनवरे, शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीष गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक आर. बी. जायभाये, अनसिंगचे पोलीस निरीक्षक गणेश भाले, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक जाधव, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण साळवे, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक एम. एम. बोडखे, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे, मानोराचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळगणे, धनजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर मानकर या पोलीस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. 

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे असून गृह शाखेचे पोलीस उपाधीक्षक के. एच. धात्रक हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रा. म. वानखेडे हे सचिव आहेत.  कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस