शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:25 IST

मंगरुळपीर  : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिषदेमध्ये  आढावा सभा घेतली.

ठळक मुद्देशहरात टँकरने पाणी पुरवठा झाला तर त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी स्वत: उभे राहुन पाण्याचे  वितरण करावे. सर्व नगरसेवकांनी पाणी टँकरची     मागणी केली असता आमदार लखन मलीक यांनी ती मान्य करुन लवकरच उपाय योजना करण्याचे आदेश दिले.

मंगरुळपीर  : मंगरुळपीर शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरुप घेतले असुन, १० ते १५ दिवसामधून एक वेळ पाणी पुरवठा होत असुन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात वाशिम - मंगरुळपीरचे आमदार लखन मलीक यांनी येथील नगर परिषदेमध्ये  आढावा सभा घेतली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार लखन मलीक होते.यावेळी नगराध्यक्षा गजाला खान ,उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, मुख्याधिकारी डॉ.मेघना वासनकर,न.प.उपाध्यक्ष  विरेदं्रसिंह ठाकुर हे होते. यावेळी आमदार लखन मलीक यांनी शहरातील खाजगी विहीरी,  विंधन विहीरी या अधिग्रहीत करुन त्यावर सबमर्शीबल  पंप, मोटारी बसवुन त्या शहरातील पाईपलाईन ला जोडण्यात याव्या , तसेच टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्यात.तसेच याकरिता आपल्या निधीमधून ३ लाख रुपये मंजुर करुन देतो, तसेच सबमर्शीबल  पंप बसवितांना पाण्याची पातळी तपासुनच  सबमर्शिबल पंप बसवावे, एवढी उपाय योजना करुनही पाणी टंचाई दुर होत नसेल तर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवुन टंचाईवर मात करण्यास चर्चा करणार असल्याचे सांगितले.   यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी नगर परिषदच्या नगरसेवकांना सांगितले की, शहरात टँकरने पाणी पुरवठा झाला तर त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी स्वत: उभे राहुन पाण्याचे  वितरण करावे जेणे करुन प्रत्येकाला पिण्याकरिता पाणी उपलब्ध होईल . तसेच तालुक्यातील ज्या प्रकल्पामध्ये जलाशय उपलब्ध आहे तेथुनच शहराकरिता पाणी आणण्याचे काम प्रशासन करीत आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मेघना वासनकर यांनी सांगितले की, सभेमध्ये सांगितलेल्या सर्व सुचना व उपाय योजनावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.  तसेच येथे पाणी पुरवठा अभियंता नसुन पुर्णवेळ अभियंता देण्यात यावे असेही मुख्याधिकाºयांनी सांगितले. यावेळी सर्व नगरसेवकांनी पाणी टँकरची     मागणी केली असता आमदार लखन मलीक यांनी ती मान्य करुन लवकरच उपाय योजना करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवक चंदुभाऊ परळीकर, लईक अहेमद, अनस अहेमद, अनिल गावंडे, सचिन पवार, ज्योतीताई लवटे, संगमित्रा पाटील यांचेसह सर्वच नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवLakhan Malikलखन मलिक