शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

  ‘मिशन अ‍ॅडमिशन’ : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणे येणार अंगलट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 15:50 IST

वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा  अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन  निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिला.

ठळक मुद्देअकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १८ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.

वाशिम - इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा  अकरावीची प्रवेश संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विहित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये अन्यथा शासन  निर्णयानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिला.अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १८ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रवेशीत जागांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कमी असल्याने मिशन अ‍ॅडमिशन सुलभ झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान किंवा संयुक्त शाखांच्या प्रवेशसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील किमान गुणांची कोणतीही अट नाही. माध्यमिक शाळांना जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता ८० व स्वतंत्र उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता १०० आणि महाविद्यालयांना जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गाची प्रवेश क्षमता १२० अशी आहे. मान्य तुकड्यांमध्ये निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांनी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. निर्धारीत प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास सदर प्रवेश पटपडताळणी व संचमान्यतेमध्ये मान्य केले जाणार नाहीत व त्यामुळे होणाºया परिणामाची जबाबदारी संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांची राहिल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. मान्यता प्राप्त तुकडीमध्ये निश्चित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या जादा असल्यास स्थानिक किंवा नजीकच्या परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याची खात्री करूनच जादा प्रवेशाची परवानगी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही दिल्या. प्रवेश प्रक्रिया इयत्ता ११ वीची असल्यामुळे इयत्ता १२ वी करिता कोणीही परवानगीशिवाय अतिरिक्त प्रवेश घेऊ नये. बारावीमधील प्रवेशही निश्चित केलेल्या विहित क्षमतेमध्येच करण्यात यावे. विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांची असल्याने कुणीही विद्यार्थी किंवा पालकांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रवेशासाठी पाठवू नये. स्पष्ट अभिप्राय नोंदवूनच प्रवेशार्थींना अपवादात्मक परिस्थितीत पाठवावे, अशा सूचना दिल्या. प्रवेश देताना देणगी घेतल्यास संंबंधितांविरूद्ध महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ नुसार कार्यवाही केली जाईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमeducationशैक्षणिक