लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दितील तपोवन येथील दोन वर्षापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला शिरपूर पोलिसांनी ५ मार्च रोजी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. रिसोड तालुक्यातील तपोवन येथून एक अल्पवयीन मुलगी जुलै २०१८ मध्ये बेपत्ता झाली होती. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी शिरपूर पोलीस स्टेशनने एका चमूकडे जबाबदारी सोपविली होती. मात्र मुलगी मिळुन येत नव्हती. अशातच बेपत्ता मुलगी नाशिक येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस स्टेशनतर्फे पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, पोलिस जमादार रतन बावस्कर, महिला पोलिस बेबीताई इंगोले हे नाशिकला रवाना झाले. या पथकाने नाशिक येथून ५ मार्च रोजी सदर मुलीला ताब्यात घेतले.
बेपत्ता मुलगी दोन वर्षानंतर नाशिक येथे सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 17:40 IST