लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकास मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये ३० जून रोजी गुन्हे दाखल केले. शिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया पांगरखेडा येथे पिडित अल्पवयीन मुलगी २९ जून रोजी रस्त्यावरुन जात होती. यावेळी गावातीलच संतोष धबडघाव याने तिचा रस्ता अडवून वाईट उद्देशाने अंगाशी झटपट केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिचे नातेवाईक सोडविण्यासाठी आले असता, आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलीने दाखल केलेल्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द कलम ३५४ ‘अ’, ३२३, ५०४, ५०६, ३४१ व बालक लैंगीक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हरिष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय शिंपणे करित आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नातेवाईकास मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 15:14 IST
मालेगाव (वाशिम) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्या नातेवाईकास मारहाण करण्यात आली. २९ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध विविध कलमांन्वये ३० जून रोजी गुन्हे दाखल केले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नातेवाईकास मारहाण!
ठळक मुद्देशिरपुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया पांगरखेडा येथे पिडित अल्पवयीन मुलगी २९ जून रोजी रस्त्यावरुन जात होती.गावातीलच संतोष धबडघाव याने तिचा रस्ता अडवून वाईट उद्देशाने अंगाशी झटपट केली.तिचे नातेवाईक सोडविण्यासाठी आले असता, आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.