शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : दूध उत्पादक संघांकडील दुधावर लादली र्मयादा; पशुपालक हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:26 IST

वाशिम: जिल्हय़ात एकमेव वाशिम येथे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी दूध उत्पादक संघांकडून पाठविल्या जाणार्‍या दुधाच्या प्रमाणावर सक्तीने र्मयादा लादण्यात आली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटर दूध स्वीकारले जात आहे. यामुळे मात्र उर्वरित हजारो लीटर दुधाची खासगी दूध संकलन केंद्रांवर अल्पदरात विक्री करावी लागत असल्याने दूध उत्पादक संघांसोबतच पशुपालकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देशासकीय दूध संकलन केंद्रात स्वीकारले जाते केवळ १२00 लीटर दूध

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात एकमेव वाशिम येथे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी दूध उत्पादक संघांकडून पाठविल्या जाणार्‍या दुधाच्या प्रमाणावर सक्तीने र्मयादा लादण्यात आली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटर दूध स्वीकारले जात आहे. यामुळे मात्र उर्वरित हजारो लीटर दुधाची खासगी दूध संकलन केंद्रांवर अल्पदरात विक्री करावी लागत असल्याने दूध उत्पादक संघांसोबतच पशुपालकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.वाशिम येथील शासकीय दूध संकलन केंद्रांवर साधारणत: २ वर्षांपूर्वी दैनंदिन ६ हजार लीटर दूध स्वीकारले जायचे; मात्र मुंबईवरून दुधाची मागणी घटल्याचे कारण समोर करून अकोला येथील शासकीय दूध संकलन केंद्राने सद्य:स्थितीत वाशिम जिल्हय़ातून पाठविल्या जाणार्‍या दुधावरही र्मयादा लादली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटरच दूध पाठवावे, अशा सूचना दिल्याने वाशिमच्या दूध संकलन केंद्राने जिल्हय़ातील ग्रामीण भागात कार्यरत १४ दूध उत्पादक संस्थांना १0 लीटरपासून २00 लीटरची र्मयादा घालून देत त्याच प्रमाणात दूध स्वीकारणे सुरू केले आहे. याव्यतिरिक्त नव्याने कुठलीच संस्था अथवा तालुका दूध उत्पादक संघाकडून दूध स्वीकारले जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मात्र हजारो लीटर दुधाची खासगी दूध संकलन केंद्रांवर अथवा शहरी भागातील नागरी वसाहतींमध्ये मिळेल त्या दरात विक्री करावी लागत असल्याने पशुपालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. 

शिरपूर परिसरातील ११ गावांमधून दैनंदिन ४ हजार लीटर दुधाची आवकजिल्हय़ातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) परिसरातील शिरपूर, वाघी, खंडाळा, बोराळा, ढोरखेडा, शेलगांव, एकांबा, वसारी, किन्ही, घाटा, मिर्झापूर या ११ गावांमधून दैनंदिन ४ हजार लीटर दूध शिरपूरच्या गजानन दूध उत्पादक संघाकडे पाठविले जाते; मात्र त्यापैकी केवळ २00 लीटर दूध वाशिमच्या शासकीय दूध संकलन केंद्राकडून स्वीकारले जात असून, उर्वरित दुधाची अल्प दरात बाजारपेठेत विक्री करावी लागत असल्याची माहिती संघाचे अभिमान उल्हामाले यांनी ‘लोकमत’ला दिली.

वाशिमच्या दूध संकलन केंद्रावर दैनंदिन केवळ १२00 लीटरच्या र्मयादेत दूध स्वीकारून ते अकोला येथील संकलन केंद्राकडे पाठविण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. त्यानुसार, जिल्हय़ातील १४ दूध उत्पादक संघांकडून १0 ते २00 लीटरच्या प्रमाणात दूध स्वीकारले जात आहे. - वाय.एस. चौधरीकेंद्रप्रमुख, शासकीय दूध संकलन केंद्र, वाशिम 

टॅग्स :washimवाशिम