शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वयाच्या ७८ व्या वर्षीही सायकलनेच मैलांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:13 IST

मैलांचा प्रवास सायकलनेच करण्याचा दिनक्रम शेलुबाजारनजिकच्या नागी येथील सेवानिवृत्त शिक्षक बापुराव राऊत गुरुजी पार पाडत आहेत.

- साहेबराव राठोड लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार: निम्मे आयुष्य ज्ञानदान करून विद्यार्थी घडविण्यात घातले. आता जिवनाच्या अखेरच्या टप्प्यावर वयाच्या ७८ व्या वर्षी कुठल्याही कामासाठी वाहनाचा आधार न घेता अनेक मैलांचा प्रवास सायकलनेच करण्याचा दिनक्रम शेलुबाजारनजिकच्या नागी येथील सेवानिवृत्त शिक्षक बापुराव राऊत गुरुजी पार पाडत आहेत. त्यांचा हा प्रवास गुटखा खान्यासाठी दुचाकीचा वापर करणाऱ्या युवकांना लाजवेल, असाच आहे.शेलूबाजारपासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर असलेले नागी हे बापुराव राऊत गुरुजीचे मूळ गाव आहे; जन्मभूमी जरी नागी गाव असले, तरी त्यांची कर्मभूमी मात्र शेलूबाजारच्या पंचक्रोशीतली दहा-बारा गावे. शिक्षण पूर्ण केल्यावर १९६५ मध्ये राऊत गुरुजी शेलूबाजारमधील लक्ष्मीचंद हायस्कूल वर शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यांच्यासोबत त्याच दिवसापासून त्यांचा 'सायकल'प्रवास सुरू झाला. आज अनेक उन्हाळे, पावसाळे आले अन गेले. राऊत गुरूजींचा सायकलचा प्रवास मात्र, थांबला नाही. ते शिक्षक म्हणून कार्यरत असताना नागीवरून शेलूला यायला कच्चा रस्ता होता. काट्या-कुपाट्यांचा रस्ता तुडवित गुरूजींनी तब्बल ३४ वर्षांत विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. गुरूजींनी शिकवलेला इतिहास विषय तर वर्गात साक्षात इतिहासातील 'तो' प्रसंगच उभा करून जायचा. तर त्यांच्या भूगोलाचा तास म्हणजे जगाची अप्रत्यक्ष भ्रमंतीच घडवून आणायचा. लोकशाहीची बीजे त्यांच्या नागरिकशास्त्राच्या तासाने अनेक विद्यार्थ्यांच्या मनात रूजवलीत. आज राजकारणात काम करणाºया अनेक विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्राची ओढ गुरूजींच्या शिकवण्यातूनच निर्माण झाल्याचे ते विद्यार्थी विनम्रपणे मान्य करतात. या सेवा काळात त्यांनी फक्त वर्गात शिकवणारा शिक्षक एवढ्याच प्रतिमेत स्वत:ला बंदिस्त केलं नाही. पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये सायकलवरून पायपीट करीत शिक्षणाचे महत्व समजून सांगितले. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. ज्या काळात स्वत:चा पगार फक्त ८० रुपये होता, त्याकाळात स्वत:च्या अन कुटूंबाच्या पोटाला चिमटा देत अनेक गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. आज गुरूजींनी शिकवलेली अनेक मुले समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात आहेत.

दररोज ८ ते १० किलोमीटर सायकल १९९९ मध्ये राऊत गुरूजी शिक्षकी पेशातून निवृत्त झालेत. मात्र, या औपचारिक निवृत्तीला त्यांनी कधीच स्वत:ला स्पर्शू दिले नाही. त्यानंतरही त्यांनी आपल्या सायकलच्या साथीने आपला शिक्षण जनजागृतीचा 'यज्ञ' कायम धगधगता ठेवला आहे. प्रवासाची साधने अलिकडे पार बदलून गेलीत. मात्र, गुरूजींच्या सायकलच्या सवारीची 'शान' आजही तशीच आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीही ते दररोज ८ ते १० किलोमीटर सायकल चालवतात. याच सायकलने त्यांना आजवर तंदुरूस्त ठेवले आहे. ना कोणता आजार, ना कोणते दुखणे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक