शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोटापाण्यासाठी भटकंती: घरांना टाळे , वस्त्या पडल्या ओस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:26 IST

आसेगाव (वाशिम): खरीपाचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेकडो शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी राज्यातील मोठ्या जिल्ह्यांसह परराज्यात स्थलांतर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम): खरीपाचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेकडो शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी राज्यातील मोठ्या जिल्ह्यांसह परराज्यात स्थलांतर केले आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील घरांना टाळे दिसत असून, वस्त्या ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील मजुरांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने कृषी उत्पादनावर आधारीत रोजगारावर अवलंबून असतो. त्यातच जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र अर्थात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे.  साहजिकच पावसाचे प्रमाण त्यावर प्रभाव टाकते. यंदा जिल्ह्यात पावसाची सरासरी ९० टक्क्यांच्यावर दिसत असली तरी, त्यात सातत्य नव्हते. आवश्यक वेळी पावसाची दांडी आणि नको त्यावेळी अतिवृष्टी, असा प्रकार यंदा पाहायला मिळाला. त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात मोठी घट आली आणि रोजगारावर परिणाम झाला. आता खरीप हंगाम संपल्यानंतर मजुरांना कामे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे शेतमजुरांनी मुलाबाळांसह परराज्याची वाट धरली आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेतमजुर ऊसतोडणीसाठी कनार्टक, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात किंवा मुंबई, पुणे यासारख्या जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात गेले आहेत. त्यामुळे या गावातील अनेक घरांना टाळे ठोकल्याचे चित्र दिसत असून, वस्त्या ओस पडल्या आहेत. शासनाने यंदा दुष्काळाची घोषणा करताना वाशिम जिल्ह्यातील स्थितीचा वस्तूनिष्ठ विचार केला नसल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत होऊ शकला नाही रिसोड तालुक्यासह चार महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करून इतर भागांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात स्थिती अगदी विपरित आहे.

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीरदरवर्षी जिल्ह्यातून हजारो मजूर ऊसतोडणीसाठी परराज्यात मुलाबाळांसह धाव घेत असल्याने त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याची नोंद मात्र शिक्षण विभाग ठेवत नाही. त्यातच परराज्यात स्थलांतर करणाºया मजुरांच्या संख्येचीही संबंधित प्रशासनाकडून नोंद घेतली जात नाही. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतराची कारणे आणि भीषणताच स्पष्ट होत नसल्याने वरिष्ठस्तरावरून त्याची दखल घेतली जात नाही.

टॅग्स :washimवाशिम