शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:31 IST

एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गंत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून डिसेंबर २०१९ या महिन्यात १० पथकांमार्फत चौकशी करण्यात आली; मात्र ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीच्या काही दिवसांत बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचलेच नाही. हा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’नेच प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केला. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सोबतच चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील नियोजित तारखांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचून चौकशी करण्यात आली.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेच्या कामांची नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार चौकशी करून तसा अहवाल वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले होते. असे असताना चौकशी प्रक्रिया संपून ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.मालेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाºया १० पथकांपैकी काहींचे चौकशी अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. सर्व पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रीतरित्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.- शंकर तोटावारसंनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम१२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पथकांना रोहयोच्या कामांची चौकशी करून तसे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत एकाही पथकाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.- डी.पी. गव्हाळेकार्यकारी अभियंता, रोहयो विभाग, आयुक्त कार्यालय, अमरावती

 

टॅग्स :washimवाशिम