शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा बाजार समिती : लिलाव शेडमध्ये व्यापार्‍यांचा माल; शेतकर्‍यांचा माल रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:03 IST

मानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्‍यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांचा माल ठेवल्या गेल्याने शेतकर्‍यांना मात्र रस्त्यावर आपला माल विक्री साठी  ठेवण्याची  पाळी आली आहे.

ठळक मुद्देमानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): नैसर्गीक आपत्तीपासून शेतकर्‍यांचा माल सुरक्षीत राहावा यासाठी कृषी उत्पन बाजार समितीच्या आवारात लिलाव शेडची उभारणी करण्यात आली. परंतु यासाठी मानोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद ठरत आहे. लिलाव शेडमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांचा माल ठेवल्या गेल्याने शेतकर्‍यांना मात्र रस्त्यावर आपला माल विक्री साठी  ठेवण्याची  पाळी आली आहे.मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव  शेडवर मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांचा माल ठेवल्या गेला आहे. ही परिस्थिती  तिन्ही शेडवर सारखीच आहे. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. वेळेवर नगदी पैसे मिळत असल्यामुळे बाहेरील तालुक्यातुन शेतकरी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणतात, लिलाव  शेडवर व्यापार्‍यांचाच माल असल्यामुळे शेतकर्‍यांना हर्रासी साठी  रस्त्यावर माल ठेवावा लागतो किंवा काही शेतकर्‍यांना आणलेला माल परत घेवुन  जावा लागतो. सध्या मोठ्या प्रमाणात तुर विक्रीसाठी आणल्या जाते. सोयाबीनच्या हंगामाच्या वेळी हिच परिस्थिती  कायम होती, त्या वेळेस बाजार समितीच्यावतीने  व्यापार्‍यांना माल उचलण्याच्या सुचना दिल्या होत्या, परंतु त्याचा फारसा फरक पडता  नसल्याचे दिसुन येत आहे. बाजार समितीवर या प्रकारावरुन व्यापार्‍यांचा वचक दिसून येत आहे.  शेतकर्‍यांचे  हित जोपासत असल्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या सर्वसमावेशकच्या संचालक, पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकर्‍यांच्यावतीने होत आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम