शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी पूर्ण; सोमवारपर्यंत मिळेल अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 16:19 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यास शो-कॉज नोटीस बजावली व नंतर चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना पाठवून करण्यात आली. याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्त्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी दिली.

वाशिम  :  प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम  रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. परंतु या महिलेचे त्याच दिवशी वाशिम येथे जात असतांना रस्त्यात रुग्णवाहिकेत नॉर्मल प्रसृती झाली. यावर रुग्णांच्या नातेवाईकाने दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचा केलेला आरोप व ईतर बाबीच्या सखोल चौकशी संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच सदर वैद्यकीय अधिकाऱ्यास शो-कॉज नोटीस बजावली व नंतर चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना पाठवून करण्यात आली. याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्त्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी दिली.रिसोड ग्रामीण रुग्णालयात ३१ जुलै रोजी प्रसृतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची थातूर-मातूर तपासणी परिचारिकांकडून करुन त्यावर वैद्यकीय अधिकाºयांनी सही मारुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करुन हात मोकळे केले. परंतु सदर रुग्ण गंभीर आहे  तर त्याची रुग्णालयापासून १५ किलोमिटर अंतरावरील रुग्णवाहिकेतच नॉर्मल प्रसृती झाली , विशेष म्हणजे ज्यावेळी या रुग्णाला रेफर करण्यात आले त्यावेळी कर्तव्यावर असेलेले वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातचं हजर नव्हते, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती मिळताच लोकमतने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. सदर प्रकरण गंभीर असल्याने या वृत्ताची दखल जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेवून येथील वैद्यकीय अधिकारी चोपडे यांच्याशी चर्चा केली. व कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी धम्मपाल मोरे यांना याबाबत सविस्तर खुलासा मागितला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हरण यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. हरण यांनी सदर चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना नेमले.  डॉ. हेडाऊ यांनी रिसोड येथे जावून सदर प्रकरणाची चौकशी केली. यासंदर्भात निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, डॉ. हेडाऊ यांची चौकशी पूर्ण झाली असून सोमवारपर्यंत ते अहवाल सादर करणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची चौकशी निवासी वैद्यकीय अधिकारी यांचेकडे दिली आहे. त्यांनी रिसोड येथे जावून चौकशी केली असून अहवाल सादर करावयाचा आहे.      

  - डॉ. ए.व्ही. सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

रिसोड येथील रुग्णवाहिकेत महिलेच्या प्रसृती प्रकरणी डॉ. हेडाऊ यांना चौकशीसाठी पाठविण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल सोमवारपर्यंत येणार आहे. अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.        

- डॉ. बालाजी हरण निवासी वैद्यकीय अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम