शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहीद जवान धोपे यांच्या आई, पत्नीचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:29 IST

वाशिम : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर  २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मेघालय राज्यातील सिलाँग येथे सीमा सुरक्षा दलात कर्तव्यावर असताना जवान सुनील विठ्ठलराव धोपे (३७) यांचा १५ सप्टेंबर  २०१८ रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सीमा सुरक्षा दलातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे यांच्या पत्नी व वृद्ध आईने ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण ६ फेब्रुवारीला तिसºया दिवशीही सुरूच असल्याचे दिसून आले.सुनील धोपे यांची हत्या झाल्याचा आरोप करून धोपे कुटुंबियाने त्यास कारणीभूत असणाºया सीमा सुरक्षा दलातील पाच अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्या लावून धरल्या होत्या. याप्रकरणी कारंजा पोलिसांत ‘झीरो एफआयआर’अंतर्गत सीमा सुरक्षा दलातील संबंधितांविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण सिलाँग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करित मृतक सुनील धोपे यांच्या आई लक्ष्मीबाई धोपे व पत्नी सविता धोपे यांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली. मात्र, उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन