शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूक ठरतेय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:50 IST

मालेगाव (वाशिम): तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूकीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून जडवाहतूक एकप्रकारे डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार हा मालेगावचा आठवडी बाजारचा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी यादिवशी किमान बाजारपेठेतील रस्त्यांवरून जडवाहतूक होऊ नये, ...

ठळक मुद्देमंगळवार हा मालेगावचा आठवडी बाजारचा दिवस आहे. फळविक्रेत्यांच्या हातगाड्या देखील रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होते.ट्रक, ट्रॅक्टरशक्य नसतानाही बाजारातील गर्दीतून वाट काढतात.

मालेगाव (वाशिम): तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूकीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून जडवाहतूक एकप्रकारे डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

मंगळवार हा मालेगावचा आठवडी बाजारचा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी यादिवशी किमान बाजारपेठेतील रस्त्यांवरून जडवाहतूक होऊ नये, यासाठी कडक पावले उचलली होती. जडवाहतूकीस सक्तीने निर्बंध लादल्याने रहदारी देखील सुरळित झाली; परंतु चालू आठवड्यातील बाजारच्या दिवशी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे निदर्शनास आले. गंभीर बाब म्हणजे फळविक्रेत्यांच्या हातगाड्या देखील रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. ट्रक, ट्रॅक्टरसह इतर जडवाहने शक्य नसतानाही बाजारातील गर्दीतून वाट काढत असताना तासन्तास छोटी वाहने अडकून पडतात. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून शहरांतर्गत जडवाहतूकीवर पुन्हा निर्बंध लावावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र