शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींची २४ मार्चला सार्वत्रिक निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 16:05 IST

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ५ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च २०१९ रोजी होईल. १३ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास २४ मार्च २०१९ रोजी मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २५ मार्च रोजी होईल व २८ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे कळविण्यात आले. 

सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 

थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींमधील सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक