शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यात कुकसा फाटा येथे रास्ता-रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 17:34 IST

मालेगाव : नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावरील कुकसा फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० ते १ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मेहकर ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. कुकसा, मांगूळझनक परिसरातील १० ते १५ गावातील सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी  १ वाजतादरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांतर्फे वाशिम जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनाची धग कमी-अधिक प्रमाणात २९ जुलै रोजी देखील कायम होती. नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावरील कुकसा फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० ते १ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी बंदची हाक दिली आहे. तातडीने मराठा आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या तरुणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात आंदोलन केले जात आहे. २९ जुलै रोजी औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती महामार्गावरील तथा मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे सकाळी ९.३० वाजतादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मेहकर ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी  १ वाजतादरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात कुकसा, मांगूळझनक परिसरातील १० ते १५ गावातील सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, पोलीस कर्मचारी दामोधर, इप्पर, रतन बावस्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणwashimवाशिमMalegaonमालेगांव