शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेतील अनेक गावे झाले पाणीदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:18 IST

कारंजा लाड - दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दुस-या वर्षी कारंजा तालुक्यात राबविण्यात आली.

ठळक मुद्देत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे गावक-यांनी केली. श्रमातून तयार केलेल्या  पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला.

कारंजा लाड - दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दुस-या वर्षी कारंजा तालुक्यात राबविण्यात आली. या स्पर्धेत ५९ गावानी सहभाग नोंदउन स्पर्धेदरम्यान गावक-यांना श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. मात्र केलेल्या कामाचे फलीत व्हाव म्हणुन वाट होती.  पावसाने गेल्या तिन चार दिवसापासून चांगलीच हजेरी लावली. परीणामी कारंजा तालुक्यातील काम केलेल्या गावात श्रमदान व यत्रांच्या सहाहयाने जलसंधारणाची कामे झाली. श्रमक-यांनी केलेल्या श्रमदानातून  जलसमृध्दी साकारली असल्याचे दिसून येत आहे.पावसाचे पाणी जमिनिवर पडल्यानंतर वाहून जाते. परीणामी गावक-यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणा-या पाण्याला चालायला शिकवणे व चालणा-या पाण्याला थांबायला शिकविणे व थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकविणे. या पाणी फांउडेशनच्या सुत्रानुसार    कारंजा तालुकयातील ५९ गावक-यांनी सत्यमेव जयते वॉटर कप चे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यापैकी विळेगाव, काकडशिवनी, बेलमंडळ, दोनद, पिंपळगाव, धनज बु, धोत्रा जहॉगीर, बांबर्डा, पोहा, शहादतपुर या गावातजलंसंधारणाची कामे यत्रांच्या व श्रमदानाच्या माध्यमातून झाली. स्पर्धेदरम्यान गावक-यांनी ४५ दिवस गावक-यांनी श्रमदान करून आपल्या गावात सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे गावक-यांनी केली. गावक-यांनी श्रमशक्ती वापरून गावात पाणी साठा निर्माण करण्यासाठी जी जलपात्रे तयार केलीत. त्या फक्त वाट होती पावसाची मात्र पावसाने गेल्या दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावली. श्रमातून तयार केलेल्या  पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला. गावातील पाणी वाहुन गेले नाही. हे गावात साचलेले पाणी पाहुन गावकरी आनंद व्यक्त करीत आहे. त्या पाण्यासोबत शेल्पी काढून श्रमाचे पाणी त्यांच्या डोळयात पाणी दिसत आहे. जलसंधारणाच्या कामाकरीता कारंजा प्रशासनाचे सहकार्य मिळाले असल्याची माहीती तालुका समन्वयक श्याम सवाई यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा